उस्मानाबाद : जि.प. अध्यक्षपदासाठी नाट्यमय घडामोडी, चेंडू शिवसेनेच्या ताब्यात, बालासाहेब जाधवर, छाया कांबळेंच नाव अध्यक्षपदासाठी आघाडीवर

उस्मानाबाद : जि.प. अध्यक्षपदासाठी नाट्यमय घडामोडी, चेंडू शिवसेनेच्या ताब्यात, बालासाहेब जाधवर, छाया कांबळेंच नाव अध्यक्षपदासाठी आघाडीवर

जिल्हा परिषदेतील सर्वच पक्षाचे सदस्य सहलीवर गेल्याने नेत्यांच्या मनातील धाकधूक वाढत होती. सोमवारी दिवसभर नाट्यमय घडामोडी झाल्या. शिवसेनेच्या मदतीने भाजप राज्यात सहा ठिकाणी सत्तेत येऊ शकते. त्यासाठी वरिष्ठ स्तरावर उस्मानाबादेत शिवसेनेला भाजपकडून मदतीचे आश्वासन मिळाले. तेव्हापासून राजकीय हालतालींना वेग आला. 55 जिल्हा परिषदेच्या संखेत शिवसेना 11, भाजप 4, काँग्रेस 13 व अपक्ष 1 अशी 29 सदस्यांची मोट बांधण्याचा प्रयत्न रात्री सुरू होता.

 

दरम्यान शिवसेनेचे दोन सदस्य राष्ट्रवादीच्या ताब्यात दिल्याची ओरड उमरगा तालुका प्रमुखाने केली. पोलिस ठाण्यात दिलेली तक्रार मागे घेण्यात आली. त्यातच पुन्हा शिवसेना, भाजप आणि काँग्रेसची बैठक झाली. शिवसेनेचे दोन सदस्य परत करण्याची मागणी वाढली. सेनेच्याच एका आमदाराने हा प्रकार केल्याची चर्चा सुरू होती. अखेर दोन्ही सदस्य सेनेच्या बाजूने येतील, या भावनेतून सेनेचा अध्यक्ष होईल, असे बैठकीत एकमत झाले. सुरूवातीला बालाजी जाधवर यांचे नाव आघाडीवर होते. त्यानंतर पुन्हा छाया कांबळे (सुकटा, भूम) याचे नाव चर्चेत आले. परंतु, शिवसेनेचे दोन सदस्य काय करतात, यावरूनच अध्यक्षपद निश्चित होईल, अशी चिन्ह आहेत.

 

 

 

 

 

 

COMMENTS