औरंगाबादमधून धक्कादायक बातमी , सेना नगरसेवकाच्या घरातून 27 विद्यार्थी ताब्यात !

औरंगाबादमधून धक्कादायक बातमी , सेना नगरसेवकाच्या घरातून 27 विद्यार्थी ताब्यात !

औरंगाबाद – क्राईम ब्रँचनं मोठी कारवाई करुन शिवसनेचे नगरसेवक सीताराम सरे यांच्या घरातून तब्बल 27 विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलं आहे. हे सर्व विद्यार्थी इंजिनिअरिंगच्या दुस-या वर्षाची परिक्षा देत आहेत. त्यांचा काल एका विषयाचा पेपर झाला. त्याच विषयाची प्रश्नपत्रिका ते आज औरंगाबादमध्ये सोडवत असल्याचं आढळून आलंय. विशेष म्हणजे शिवसेनचे नगरसवेक सीताराम सुरे यांच्या घरातच हे सर्व विद्यार्थी परिक्षा देत होते. या विद्यार्थ्यांमध्ये तीन मुलींचाही समावेश आहे. एका मिळाल्या माहितीनुसार औरंगाबाद क्राईम ब्रान्चनं शिवसेना नगरसेवक सीताराम सुरेंच्या घरावर छापा टाकून ही कारवाई केली आहे. या गौडबंगालामागं कॉलेजचाही हात असल्याचं बोलंलं जातंय. हे सर्व विद्यार्थी साई इंजिनिअरिंगच्या द्वितीय वर्षात शिकत आहेत.

COMMENTS