कर्जमाफीचे निकष ठरवण्यासाठी आज दुपारी 4 वाजता बैठक

कर्जमाफीचे निकष ठरवण्यासाठी आज दुपारी 4 वाजता बैठक

कर्जमाफीचे निकष ठरवण्यासाठी राज्य सरकारचे प्रतिनिधी आणि शेतकरी सुकाणू समितीचे प्रतिनिधी यांच्यात आज बैठक होणार आहे. मुंबईत सह्याद्री अतितीग्रहावर दुपारी 4 वाजता ही बैठक होणार आहे. शेतकरी सुकाणू समितींच्या प्रतिनिधीमध्ये खासदार राजू शेट्टी, बच्चू कडू, रघुनाथ दादा पाटील, रवि तुपकर, आमदार जंयत पाटील, डॉ. अजित नवले, बँक प्रतिनिधी विश्वास उटगी, शेतकरी प्रतिनिधी धनंजय जाधव (पुणतांबे), संजय पाटील, बळीराम सोळंके या प्रतिनिधींचा समावेश आहे. कर्जमाफीचे नेमके निकष काय ठरतात याकडे संपूर्ण राज्यातील शेतक-यांचे लक्ष लागले आहे. सरकारी प्रतिनिधी आणि शेतकरी प्रतिनिधी यांच्यात निकषाबाब कितपट एकवाक्यता होते की वाद होतो ते पहावं लागेल.

COMMENTS