कल्याण : शिवसेनेला धक्का, खोणी ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा

कल्याण : शिवसेनेला धक्का, खोणी ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा

कल्याण –  खोणी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणूकीसाठीचे मतदान आज पार पडले. गेली अनेक वर्षांपासून ग्रामपंचायतीवर सेनेचे असलेले वर्चस्व मोडीत काढत भाजपाने येथे कमळ फुलविले असून भाजपाचे सदस्य हनुमान ठोंबरे यांचा विजय झाला आहे.

एकूण 11 ग्रामपंचायत सदस्यांपैकी 7 सदस्यांनी भाजपाला तर 2 सदस्यांनी शिवसेनेला मतदान केले. उर्वरित दोन सदस्य उपस्थित नव्हते विशेष म्हणजे अनुपस्थित असलेले दोन्हीही सदस्य शिवसेनेचे असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. खोणी ग्रामपंचायतीमध्ये 11 पैकी शिवसेनेचे 6 तर भाजपाचे 5 सदस्य आहेत. सेनेचे सरपंच अबीर दातीलकर यांनी पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या सरपंचपदासाठी आज दुपारी खोणी ग्रामपंचायतीत मतदान पार पडले. भाजपाचे 5 सदस्य असूनही 7 मत भाजपच्या पारड्यात पडल्याने सेनेचे दोन सदस्य आपल्याकडे वळविण्यात भाजपने यश मिळवल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे खोणी ग्रामपंचायतीवर विजय मिळवून ग्रामीण भागात असलेल्या सेनेच्या वर्चस्वाला भाजपाने धक्काच दिला आहे.

यावेळी केडीएमसीचे उपमहापौर मोरेश्वर भोईर, भाजपचे नगरसेवक महेश पाटील, कल्याण जिल्हासरचिटणीस शिवाजी आव्हाड आदी उपस्थित होते.

 

COMMENTS