काँग्रेसच्या कर्जमाफी अभियानात काँग्रेस- भाजप आमने सामने !

काँग्रेसच्या कर्जमाफी अभियानात काँग्रेस- भाजप आमने सामने !

‘माझी कर्जमाफी झाली नाही’ या काँग्रेसच्या राज्यव्यापी अभियानाला आज बुलडाणा शहरातून सुरूवात झाली. त्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि विधान परिषदेचे उपसभापती  हे आज बुलडाण्यात आले होते. यावेळी काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. गर्दे हाॅलमध्ये काॅंग्रेस एल्गार माेर्चाच्या बैठकीपूर्वी जयस्तंभ चौकात भाजप कार्यकर्ते काॅंग्रेस नेत्यांचा निषेध करण्यासाठी काळे झेंडे घेऊन उभे हाेते. त्यांची जाेरात घाेषणा बाजी सुरू हाेती. याचवेळी काॅंग्रेसचे कायकर्त्यांनी ‘माेदी चाेर है..’ अशी घाेषणाबाजी सुरू केली. दरम्यान, पाेलिसांनी भाजप- काॅंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

COMMENTS