काँग्रेसमधील काही नेतेच माझ्याविषयी अफवा पसरवित आहेत, पक्षांतरावरुन नारायण राणेंचा प्रहार

काँग्रेसमधील काही नेतेच माझ्याविषयी अफवा पसरवित आहेत, पक्षांतरावरुन नारायण राणेंचा प्रहार

मुंबई – मी काँग्रेस सोडणार, कधी शिवसेनेत जाणार तर कधी भाजपात जाणार अशा बातम्या माध्यमातून येत आहेत. या मागे काँग्रेसमधीलच काही नेते असल्याची टीका ज्येष्ठ काँग्रेस नेते नारायण राणे यांनी केलीय. काही कामानिमित्त मी मुख्यमंत्र्यांना भेटलो याचा अर्थ मी भाजपमध्ये जात आहे हे म्हणणं चुकीचे आहे असंही राणे यांनी सांगितलं.  मी कोणत्याही पक्षात जाणार नाही,  मला कोणीही भेटले नाही. या अफवा पसरवल्या जात आहे. ह्या मागे कांग्रेसचीच काही लोकं आहेत. माझ्यावर याचा काहीही परिणाम होणार नाही. मी संघर्ष करत आलो आहे. निलंबित आमदार मध्ये नितेशचे नाव याआधी होते असे मला सांगण्यात आले. मला याचे काही वाटत नाही. शेतकरीसाठी आंदोलन होते, त्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे. मला या निलंबन किंवा नितेशबाबत अशी कल्पना नव्हती. मी लपवा छपवी करणारा नाही. जे काही आहे ते मीडिया समोर येऊन सांगितलं आहे .. ऑफर माझ्या पर्यंत आलेली नाही.

राज्यातील काँग्रेस नेत्यांच्या कार्यपद्धतीवरही राणे यांनी टीका केली. त्यामुळे काँग्रेसच्या राज्यातील नेतृत्वबदालाची गरज असल्याचं अप्रत्यक्षरित्या सूचवलं. मात्र पक्षश्रेष्ठीना ही बाब समजली पाहिजे अशी बतबलताही व्यक्त केली. राज्यात काँग्रेसचा पराभव होत असताना सिंधुदुर्गात मात्र काँग्रेस  जिंकली असं सांगत आपण राज्याचं नेतृत्व केलं तर सिंधुदुर्गसारखा रिझल्ट राज्यातही देऊ शकतो असं न सांगताच सांगून गेले. जिल्हा परिषद निवडणुकीत पक्षाने केलेल्या अभद्र युतीवरही त्यांनी टीका केली.

COMMENTS