काँग्रेस आमदाराची शेतक-याला मारहाण, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

काँग्रेस आमदाराची शेतक-याला मारहाण, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

शेतक-यांच्या प्रश्नावरुन सरकारला धारेवर धरणा-या काँग्रेसला अडचणीत आणणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये काँग्रेसचे औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार एका शेतक-याला मारहाण आणि शिविगाळ करत असल्याचं पहायला मिळतंय. अब्दुल सत्तार यांची सिल्लोडमध्ये जमीन आहे. त्यांचा शेजारी असलेल्या मुख्तार सत्तार यांना त्यांनी मारहाण केल्याचा आरोप आमदारांवर आहे. आपली जमीन हडपण्याचा आमदार सत्तार यांचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांचे शेजारी मुख्तार सत्तार यांनी केला आहे. सत्तार आणि त्यांच्या मुलाने आपल्याला मारहाण केली असाही आरोप मुख्तार सत्तार यांनी केला आहे. या प्रकरणी आपण सिल्लोड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. मात्र आमदारांच्या दबावामळे ती तक्रार दाखल करुन घेतली जात नसल्याचा आरोपही मुख्तातर सत्तार यांनी केला आहे. या व्हिडिओमुळे आमदार सत्तार आणि काँग्रेस पक्ष अडचणीत येण्याची शक्यता आहे.

COMMENTS