नांदेड महापालिका निवडणूक सभा – काँग्रेस नेत्यांच्या भाषणातील  प्रमुख मुद्दे

नांदेड महापालिका निवडणूक सभा – काँग्रेस नेत्यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

नांदेड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सिडको येथे काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ रविवारी जाहीर सभा घेण्यात आल्या.

 

प्रमुख नेत्यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे 

 

माजी केंद्रीय गृहमंत्री  सुशीलकुमार शिंदे –

शंकरराव चव्हाण यांच्या दूरदृष्टी मुळे नांदेडला कधी पाण्याची अडचण भासत नाही

अशोक चव्हाण यांनी आपल्या सर्व पदांचा वापर ना़देडच्या विकासासाठी केला

विश्वास नावाची चीज देशाच्या पंतप्रधानाकडे असली पाहिजे पण  दुर्देवाने आज ती दिसत नाही.

मोदी सरकारच्या काळात सीमेपलीकडून होणा-या घुसखोरीत वाढ झाली.

विकास नाही तर सत्यानाश करण्याचे काम सरकारकडून सुरु आहे.

भाजपवाले ग्रामपंचायत पासून लोकसभेपर्यंत सगळीकडे फक्त फसवणूक करतायेत

नरेंद्र मोदी मनमोहनसिंग यांच्या लायब्ररीत डोकावले असते तरी त्यांना अर्थशास्त्र कळाले असते.

देशाचे दिवाळे काढण्याचे काम मोदी करित आहेत

भाजपच्या  लोकांना देशाचे संविधान बदलण्याची फार घाई झाली आहे.

समाजात जातीय तेढ निर्माण करून देशातला सर्वधर्मसमभाव खिळखिळा करण्याचे काम भाजपकडून सुरु आहे

भाजपला मत म्हणजे विनाशाला मत त्यामुळे नांदेडमध्ये काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना विजयी करा.

 

खा. अशोक चव्हाण –

भाजपाला नांदेडात नेता नाही

उमेदवार इथून तिथून गोळा केले आणि जो पक्षात नाही त्याला भाजपने नेता केले

पेट्रोलचे भाव गगनाला भिडले आहेत शेतकरी आत्महत्यांचा आकडा १५ हजारांवर गेला कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा?

राज्याच्या दुरावस्थेला भाजप इतकीच शिवसेना जबाबदार आहे

भाजपाने शिवसेना संपवली तरी उध्दव ठाकरे सत्तेतून बाहेर पडत नाहीत उध्दव ठाकरे सत्ता सोडू शकत नाहीत

लोकांचा कळवळा असेल तर शिवसेनेने सत्ता सोडावी

भाजप सरकारच्या काळात सामाजिक तणाव वाढला

तीन वर्षात लोकांच्या हिताचा एकही निर्णय सरकारने घेतला नाही

नांदेड महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा बहुमताने फडकवणार

रावसाहेब दानवे स्वत:च्या गावातील नगरपालिका निवडून आणू शकले नाहीत ते दानवे नांदेडची महापालिका काय जिंकणार

 

मोहन प्रकाश –

सरचिटणीस अखिल भारतीय काँग्रेस कमिटी व प्रभारी महाराष्ट्र

गोरखपूर हॉस्पीटलमधील घटना असो नाहीतर यवतमाळ मधील शेतक-यांचा फवारणी करताना झालेले मृत्यू असो

मोदींच्या राज्यात सगळ्या गोष्टी महाग झाल्या आहेत फक्त माणसांचे मरण स्वस्त आहे

शेतकरी, व्यापारी, युवक, महिला, या सर्व वर्गात सरकारच्या धोरणा विरोधात प्रचंड असंतोष आहे

देशातले उद्योग अडचणीत आले आहेत  उत्पादन घटले आहे बेरोजगारी वाढली आहे.

देश परदेशी शक्तींच्या हातात देण्याचे काम मोदी करित आहेत.

बुलेट ट्रेन भारतातल्या युवकांना रोजगार देण्यासाठी नाही जपानच्या फायद्यासाठी

 

COMMENTS