सायबर हल्ल्याचा रोख आता खेड्यांवरही, तुमची ग्रामपंचायत तरी सुरक्षित आहे ना ?

सायबर हल्ल्याचा रोख आता खेड्यांवरही, तुमची ग्रामपंचायत तरी सुरक्षित आहे ना ?

युरोपसह जगातील अनेक देशांमध्ये कम्प्यूटर व्हायरस हल्ला झाला आहे. जगभरात थैमान घालणं-या या ‘रेन्समवेअर’ व्हयरसचा हल्ला आता कोकणातही झालाय. सिंधुदुर्गातील मळेवाड ग्रामपंचायतीचा डेटा हॅक झाला आहे तर हा डाटा पुन्हा देण्यासाठी 300 डॉलरची मागणी करण्यात आली आहे. या घटनेने कोकणात  एकच गोंधळ उडाला असून जिल्हा प्रशासन खडबडून जागं झालं आहे. देशातला एखाद्या ग्रामपंचायताच्या कॉप्युटरवर सायबर हल्ला होण्याचा बहुदा हा पहिलाच प्रकार आहे.  राज्यपातळीवर या प्रकाराची दखल घेण्यात आली आहे. केंद्र आणि राज्य सरकार सर्व ग्रामपंचायतीचे डिजिटलायझेशन करण्यासाठी पुढाकार घेत असताना या हल्ल्यानं सायबर सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. काही दिवसांपूर्वी याच व्हायरसने जगातील जवळपास 74 देशांंमध्ये धुमाकूळ घातला होता.  इंग्लडमधील संपूर्ण आरोग्य व्यवस्था या हल्ल्यामुळं कोलमडली होती.  ग्रामपंचायतीत  यंत्रणा अपडेट करण्याचं काम सुरु असताना ही बाब निदर्शनास आली आहे. व्हायरस घुसल्याने त्यात असलेला ऑफ लाईन डाटा पूर्णतः लॉक झाला आहे. त्यामुळे सर्व काम ठप्प झालं आहे. या प्रकरणामुळं सर्व ग्रामपंचायती आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही हा धोका टाळण्यासाठी काय करायला पाहिजे याबाबत मार्गदर्शन करावे अशी मागणी होत आहे. अशा प्रकरारचा हल्लाा झाल्याची तक्रार ग्रामपंयायती मार्फेत गुन्हेशाखेच्या सायबर विभागाकडे करण्यात आली आहे.

COMMENTS