खा. उदयनराजे भोसलेंवर योग्यवेळी कारवाई होणारच – गृहराज्यमंत्री दीपक केसरकर

खा. उदयनराजे भोसलेंवर योग्यवेळी कारवाई होणारच – गृहराज्यमंत्री दीपक केसरकर

कोल्हापुर – साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार  उदयनराजेंवर कारवाई होणार असल्याचं गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आज स्पष्ट केलं. उदयनराजेंच्या अटकेसाठी सातारा पोलिसांनी काल रात्री दाखवलेल्या धैर्याचं कौतुक केलं. कायदा आणि सुवव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून पोलिसांनी रात्रीच्या वेळी कारवाई करण्याचं टाळल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

लोणंद येथील सोना अलाईज कंपनीचे मालक राजकुमार जैन यांना खंडणीसाठी धमकावल्या प्रकरणी उदयनराजे भोसले यांच्यावर गुन्हा दाखल आहे. उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्या नंतर पहिल्यांदाच उदयनराजे साताऱ्यात दाखल झाले. यावेळी त्यांच्या समर्थकांनी मोठ्या जल्लोषात त्यांचं स्वागत केलंय.

‘कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून उदयनराजे यांच्यावर पोलिसांनी रात्री कारवाई केली नाही. पोलीस योग्यवेळी कारवाई करतील’. असे दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS