खा. गायकवाडांच्या विमान प्रवासावरील बंदी उठवा – शिवसेनेची मागणी

खा. गायकवाडांच्या विमान प्रवासावरील बंदी उठवा – शिवसेनेची मागणी

दिल्ली – खासदार रविंद्र गायकवाड यांच्यावरील विमान प्रवासाची बंदी उठवा अशी मागणी शिवसेनेच्या खासदारांनी लोकसभा सभापती सुमीत्रा महाजन यांच्याकडे केली. खासदार आनंदराव आडसूळ, चंद्रकांत खैरे, अनिल देसाई, गजानन किर्तीकर, अरविंद सावंत, शिवाजीराव आढळराव पाटील यांनी महाजन यांची भेट घेऊन ही बंदी मागे घेण्याचं पत्र सुमित्रा महाजन यांना दिलं. गायकवाड यांनाच मारहाण झाली असून त्यांना शिवीगाळही करण्यात आली आहे असा आरोप पत्रात करण्यात आला आहे. विमान प्रवास नाकारणे म्हणज्ये मुलभूत अधिकार डावलणे असंही त्यात नमूद करण्यात आलंय. लोकसभा सभापती त्यांच्या अधिकाराचा वापर करुन बंदी उठवू शकतात. त्यामुळे त्यांनी ती तात्काळ बंदी उठवावी असंही पत्रात नमूद करण्यात आलंय.

COMMENTS