खा. रवींद्र गायकवाडांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

खा. रवींद्र गायकवाडांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

वादात अडकलेले शिवसेनेचे उस्मानाबादचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सेना भवनात भेट घेतली. खासदार गायकवाड हे आज सकाळी राजधानी एक्स्प्रेसनं मुंबईत पोहोचले. एअर इंडियाने कालच खासदार गायकवाड यांच्यावरील विमानप्रवासबंदी उठवली. मात्र तरीही गायकवाड रेल्वेनेच दिल्लीहून मुंबईकडे रवाना झाले.

रवींद्र गायकवाड राजधानी एक्स्प्रेसने सकाळी मुंबईत दाखल झाले. ते ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरेंची भेट घेणार असल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र शिवसेना भवनात त्यांची भेट झाली.

जवळपास दोन आठवड्यांनी खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावरील विमानबंदी हटवण्यात आली. शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर अखेर एअर इंडियाने आपला निर्णय मागे घेतला. मात्र गायकवाड यांनी माफी माघावी अशी भूमिका एअर इंडियाने घेतली होती. पण मी संसदेची माफी मागेन, एअर इंडियाची नाही असं रवींद्र गायकवाड यांनी काल म्हटलं होतं.

 

COMMENTS