गुजरात काँग्रेसचे आमदार ठेवलेल्या रिसॉटवर आयटीच्या रेड !

गुजरात काँग्रेसचे आमदार ठेवलेल्या रिसॉटवर आयटीच्या रेड !

मुंबई – गुजरातमधील काँग्रेसच्या अडचणीत थांबायचं नाव घेत नाहीत. राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या 6 आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे काँग्रेस पक्ष अडचणीत आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे राजकीय सचिव अहमद पटेल हे गुजरातमधून राज्यसभेच्या रिंगणात आहेत. त्यांची कोंडी करण्यासाठी भाजपनं भाजपनं काँग्रेस आमदारांची तोडफोड सुरू केलीय. त्यामुळे काँग्रेसने सर्व राहिलेले सर्व आमदार कर्टनातटातील एका रिसॉटवर ठेवले आहेत. मात्र त्याच ठिकाणी आज आयटीने रेड केल्या आहेत. या रेड मागचं कारण समजू शकलेलं नाही. दरम्यान भाजपचे लोक काँग्रेसच्या आमदारांना 15 कोटी रुपयांची ऑफर देत आहेत. त्यांच्यावर आयटीच्या रेड टाका असा टोला काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांनी लगावला आहे.

COMMENTS