गुजरात शिक्षण मंडळाचे ‘पाकिस्तान झिंदाबाद’ !

गुजरात शिक्षण मंडळाचे ‘पाकिस्तान झिंदाबाद’ !

बातमीचं हेडींग वाचून तुम्हाला धक्का बसला असेल पण गुजरातच्या सूरत जिल्हा शिक्षण विभागाच्या होमपेजवर ‘पाकिस्तान झिंदाबाद’ आणि पाकिस्तानचा झेंडा पोस्ट केला. होय… मात्र हे  शिक्षण विभागाचे संकेतस्थळ हॅक करण्यात आले होते. त्यामुळे हा सर्व प्रकार घडला आहे.

शिक्षण विभागाच्या होमपेजवर हॅकर्सनी ‘पाकिस्तान झिंदाबाद’ लिहित पाकिस्तानचा झेंडा पोस्ट केला. मात्र हे संकेतस्थळ काही वेळातच रिस्टोर करण्यात आलं. त्यामुळे शिक्षण विभागाचं संकेतस्थळ पूर्ववत झाले आहे. सायबर हंटरकडून संकेतस्थळ हॅक करण्यात आल्याचा उल्लेख होमपेजवर करण्यात आला होता. भारत आणि पाकिस्तानच्या संबंधांमधील तणाव वाढल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीयांच्या भावना भडकवण्यासाठी सूरत जिल्हा शिक्षण विभागाचे संकेतस्थळ हॅक करण्यात आलं होतं. सूरत जिल्हा शिक्षण विभागाचं संकेतस्थळ हॅक करत हा ‘केवळ सुरक्षेचा इशारा’ असल्याचं हॅकर्सनी होमपेजवर नमूद केलं होतं.

हॅकर्सकडून एप्रिल महिन्यात आयआयटी दिल्ली, दिल्ली विद्यापीठ आणि अलीगढ मुस्लिम विद्यापीठ या संस्थांची संकेतस्थळं हॅक करण्यात आली होती. यामध्ये पाकिस्तानी हॅकर्सचा हात असल्याचं आढळून आलं होतं. या हॅकर्सनी स्वत:ला पीएचसी गटाचं सदस्य असल्याचं म्हटलं होतं. पीएचसी गटानं मागील वर्षी भारतातील 7,100 संकेतस्थळं हॅक केल्याचा दावा केला होता. ही संकेतस्थळं अवघ्या काही वेळातच रिस्टोर करण्यात यश आलं होतं.

COMMENTS