गोमांस बंदी उठवू; भाजप उमेदवारांचे आश्वासन

गोमांस बंदी उठवू; भाजप उमेदवारांचे आश्वासन

हेडींग वाचून तुम्हाला धक्का बसला असेन पण हे खरं आहे एकीकडे  देशभरात गोमांस आणि तोंडी तलाकला  विरोध होत असतानाच मालेगाव मात्र वेगळंच चित्र पाहीला मिळालं.   मालेगाव महापालिका निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर लढत असलेल्या शेख अख्तर यांनी तोंडी तलाक  हा मुस्लिमांचा मुलभूत अधिकार  आहे. तसचं सत्तेत आल्यास गोमांस  बंदी उठवू असं देखील  अख्तर यांनी आश्वासन दिलं आहे.

‘सर्वोच्च न्यायालयाने जरी तोंडी तलाकविरोधात निकाल दिला तरी, आम्ही तो मान्य करणार नाही,’ असे अख्तर यांनी म्हटले आहे. पक्षाच्या भूमिकेच्या अगदी विरोधात भूमिका घेणाऱ्या अख्तर यांना शांत करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र भाजपचे अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी केला. मात्र तो व्यर्थ ठरला. यामुळे भाजपमध्येच गोमांस बंदी आणि तोंडी तलाकच्या मुद्यावर एकमत आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

दरम्यान , मालेगाव महापालिका निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली असून, मालेगाव महापालिकेसाठी  उद्या (24 मे)  मतदान होत असून, या निवडणुकीत 84 पैकी 77 जागांवर भाजपने आपले उमेदवार उतरवले आहेत. विशेष म्हणजे, यातील 45 उमेदवार हे मुस्लीम आहेत.

COMMENTS