छोट्या मनपांमध्ये थेट जनतेमधून महापौरांची निवड – मुख्यमंत्री

छोट्या मनपांमध्ये थेट जनतेमधून महापौरांची निवड – मुख्यमंत्री

औरंगाबाद – राज्यातील ‘क’ व ‘ड’ दर्जाच्या महानगरपालिकांमध्ये थेट जनतेतून महापौर  निवडण्याचे विचाराधीन आहे. येणार्‍या काळात त्याबाबतचा निर्णय घेतला जार्ईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. नगराध्यक्षांप्रमाणेच महापौरांची निवडही जनतेतूनच करण्याची मागणी आहे. पण तुर्तास मोठ्या शहरांमध्ये हे कठीण आहे. तरीही राज्यातील लहान महानगरपालिकांमध्ये जनतेतून महापौर निवडण्यासाठी राज्य सरकार लवकरच अभ्यासपूर्ण निर्णय घेईल, असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिले. औरंगाबाद शहरात 109व्या अखिल भारतीय महापौर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यावेळी ते बोलत होते.

अखिल भारतीय महापौर परिषदेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मध्य प्रदेशचे महसूलमंत्री उमाशंकर गुप्‍ता, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, खासदार चंद्रकांत खैरे, अखिल भारतीय महापौर परिषदेचे अध्यक्ष विवेक सेजलवलकर, शहराचे महापौर भगवान घडामोडे आदी उपस्थिती होते.

COMMENTS