जळगावच्या महापौरपदी मनसेचे ललित कोल्हे ?

जळगावच्या महापौरपदी मनसेचे ललित कोल्हे ?

जळगावचे महापौर नितीन लढ्ढा यांनी आज अचानक पदाचा राजीनामा प्रभारी आयुक्त जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर यांच्याकडे सुपूर्द केला. लढ्ढा यांच्या जागी मनसेचे नेते उपमहापौर ललित कोल्हे यांची वर्णी लागणार असल्याची पालिकेच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. जळगाव महापालिकेत मनसेच्या पाठिंब्यावर माजी मंत्री सुरेश जैन प्रणित खान्देश विकास आघाडीची सत्ता असून लढ्ढा हे गेल्या दीड वर्षांपासून महापौरपदी होते. जैन यांच्या आदेशावरून लढ्ढा यांना राजीनामा द्यावा लागल्याचं बोललं जातंय.

COMMENTS