जीएसटी पुरवणी विधेयकांना केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजुरी

जीएसटी पुरवणी विधेयकांना केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजुरी

केंद्रीय मंत्रिमंडळानं आज ( सोमवारी) जीएसटीच्या चार पुरवणी विधेयकांना मान्यता दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या या मंजुरीमुळं  आता या विधेयकांना संसदेत मांडले जाणार आहे. 

 

दरम्यान वस्तू व सेवा कर म्हणजेच जीएसटी कायद्यावर राज्यांनी घेतलेल्या आक्षेपांचं निराकरण करण्यासाठी केंद्र सरकारनं पुरवणी विधेयक आणली आहेत. नुकसान-भरपाई, सेंट्रल जीएसटी, इंटिग्रेटेज जीएसटी आणि युनियन टेरिटरी जीएसटी अशी ही विधेयकं आहेत. या विधेयकांचं लवकरात लवकर कायद्यात रूपांतर करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळंच केंद्रीय मंत्रिमंडळानं आज प्राधान्यानं या विधेयकांना मंजुरी दिली.

COMMENTS