ज्येष्ठ कृषीतज्ज्ञ, ज्येष्ठ कृषी अभ्यासक, पत्रकार यांच्या नजरेतून शेतकरी संप

ज्येष्ठ कृषीतज्ज्ञ, ज्येष्ठ कृषी अभ्यासक, पत्रकार यांच्या नजरेतून शेतकरी संप

 

शेतकरी संपाची सोशल मीडियातूनही जोरदार चर्चा सुरू आहे. नेटधारकांनी सोशल मीडियातून शेतकरी संपावर त्यांची मते मांडली आहे. कृषीतज्ज्ञ, कृषी अभ्यासक, पत्रकार यांनीही काही मते मांडली आहे. यातील काही निवडक प्रतिक्रिया आम्ही इथे देत आहोत. संबधितांच्या पोस्ट आहे तशा दिल्या आहेत. त्यामध्ये एकही शब्द बदललेला नाही.

 

चंद्रकात वानखेडे यांची फेसबूक पोस्ट…..

शेतकऱ्यांनी उभ मिरचीच पिक शेतात जाळून टाकल कोणी बोलल नाही .कांदा जमिनीत गाडून त्याचा चिखल केला कोणाच तोंड उलल नाही. टमाट्याच्या उभ्या पिकात ढोर सोडावी लागली कोणाच्या तोंडातून ब्र फुटला नाही. तुरीचे ढिगच्या ढिग उघड्यावर महिना महिना खरेदी अभावी कृषी उत्पन्न बाजार समितीत बेवारस पडले आहेत कोणी आेरडा केला नाही. ज्यांच्या तरीची खरेदी झाली त्यांचे अजून चुकारे नाहीत कोणाचा हुं का चु नाही .त्यांना आता “नासाडी” दिसते आहे? ज्या शेतकऱ्यांच्या उभ्या आयुष्याची “नासाडी” या व्यवस्थेने केली त्या वेळेस कुठे गेला होता तुझा माझा धर्म? पण आज त्याचाच माल तो रस्त्यावर उधळतो आहे , त्याचेच दुध तो रस्त्यावर आेततो म्हटल्यावर तु का बोंब मारतोय ? त्याने त्याचाच माल लुटला तर तुझा का तिळपापड होतोय कारण तो तुला मला लुटायला मिळत नाही म्हणून?
शेतकऱ्यांना या बाबत काही शिकविणे म्हणजे आपल्या बापालाच झवणे शिकवण्या सारखे आहे हे तुम्ही आम्ही जितक्या लवकर समजून घेवू तितके अधिक चांगले.त्याच्या या पराकोटीच्या उद्रेकाला,आक्रोषाला समजावून घेता आले ,शांत करता आले, त्याच्या मागण्यांच्या संदर्भात सरकारला काही दोन शब्द सुनावता आले तर बघा. सरकार समोर शेपटी घालणारे तुम्ही आम्ही शेतकऱ्यांवर कोणत्याही कारणाने शिंग काढून येणार असाल तर शेतकरी तुमची ती शिंग उपटून तुमच्या हातात देईल हे लक्षात घ्या.
चंद्रकात वानखडे .

………………………………………………

ज्येष्ठ कृषीतज्ज्ञ, बुधाजीराव मुळीक यांची फेसबुक पोस्ट

मित्रहो!
मला शेतकर्यांच्या संपाबाबत आलेला सोशल मिडीया मेसेज मी आपणास थोडा शब्द व वाक्यरचना बदलून पाठवित आहे.
पण आशय बदललेला नाही.
मी या भावनेशी सहमत आहे.
पण भावनांचे रूपांतर क्रुतीत न होण्यसाठी शासनाचे सकारात्मक कार्यवाहीची गरज आहे.
मागण्या जिल्हाधिकार्याकडून मुख्यमंत्रीजी मागवून घ्या आणि कार्यवाहक करा.
गरज असल्यास अध्यादेश काढा.

*शेतकऱ्यांच्या संपावर भूमिका व्यक्त करणाऱ्यांनो जरा भानावर या..*
काल सकाळपासून शेतकऱ्यांनी संप सुरू केला.
आता कुठे सुरूवात झालीय,
एक लक्षात घ्या…
शेतकर्यांची मुले सैन्यदलात ,एस टी, कार, ट्रक, हमाल,
खासगी बसेस, रेल्वे, पोलीसदलात, रेल्वेत ड्रायवर
म्हणुन ,तसेच शहरात , छोट्या मोठ्या कंपन्यात
नोकर्या करतात.
त्यांची संख्या साधारण कांही ठिकाणी 90% टक्केपर्यंत आहे,
आम्ही संपावर असलेने -त्यांना सुद्धा आम्ही संपावर बोलवु.
मग तुम्ही पाकीस्तान,चिन, बागंलादेश,श्रीलंका यांचे
सीमेवरील रक्षण, संप मिटेपर्यंत, शहरातील बुद्धीवंत , अधिकारी व मंत्री यांना घेऊन करावे,
देशाच्या रक्षणाच्या जबाबदारीचा मक्ता काय फक्त आमच्याच मुलांनी का घ्यावयाचा?
आम्ही येथे आत्महत्या करूण मरायच
आणी
सीमेवर आमच्या मुलानी शत्रुराष्ट्राचे सैन्य किवा
अतीरेक्यांच्या हल्यात मरायचे,
त्यापेक्षा तुम्ही आम्हाला काही देऊ नका व
आम्ही तुम्हाला काही देणार नाही. “हिसाब बराबर.”
शासन व बुद्धीवंत खंबीर आहेत, परदेशातुन शेतमाल आणायला व देशाचे रक्षण करायला.
आपण शेतकर्यानी फक्त आपल्यापुरत व शेतमजुरापुरतच पीकवु आणी खावु.
आणी निवडनुक आली की मतेही त्यांनाच देऊ .
कारण त्यांचे शिवाय देश व राज्य चालवायला कुणाला जमणार आहे?
शेतकरी मित्रांनो पटतय ना…..
नाहीतर शेतकर्यानी संप केल्यास आम्ही शेतमाल खाण्यासाठी
आयात करू असे कांही वाचाळवीर बोलतातच.
मग मतदारहि आयात करा आणि तुमच्या संरक्षणाचे कंत्राटहि कोणालाहि द्या.
आमचे संरक्षण करण्यास आम्ही समर्थ आहोत.

*मित्रांनो एक सुचना :
संयम व शातंतेत संप चालु ठेवायचाय,
कारण काल पासुन संपात फुट पडावी
म्हणुन काही विचारवंत ? भडखाऊ पोस्ट टाकत आहेत,
त्यांना काहीही प्रतीक्रीया देऊ नका संयम ठेवा*

*जय जवान जय किसान*

 

………………………………………………………………………………………………………………………

 

वरीष्ठ पत्रकार चंद्रकांत पाटील यांची वॉट्सअप पोस्ट

“भाट साले”

 

“देशातील उच्च आणि मध्यमवर्गीय शहरी ग्राहकांना पाण्याची बाटली 15 रुपयांना घेतलेली चालते, पण गव्हाच्या किंवा तांदळाच्या किंमतीत एक रुपयाने वाढ झालेली खपत नाही’ काही दिवसांपूर्वी चिदंबरम यांनी असे वक्तव्य केले, तेव्हा त्यांच्यावर अनेकांनी टिका केली. पण त्यांचा हेतू शेतमालाला भाव मिळावा हाच होता. उलट चिदंबरम यांनी वस्तुस्थिती सांगितली होती. आज अशीच काहीशी टिका सरकारचे काही “भाट” शेतकऱ्यांवर करीत आहेत. पण ती टिका शेतकऱ्यांवर करीत आहेत. तर मुख्यमंत्री त्यांच्या नेहेमीच्या पोपटपंचीत व्यस्त आहेत.

केवळ अशी वक्तव्ये न करता ते वास्तव लक्षात घेऊन काही धोरणे आखण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा अवांतर गोष्टीत लोकानां गुंतवून ठेवले जात आहे. त्यासाठी लोकांची मती गुंग करणारी एक टोळीच तयार झाली आहे. सत्ताधारी आणि त्यांचे भाट लोकांना गंडवण्याचं काम करीत आहेत. सरकारने काय करायला हवं तरच शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य आधारभूत किंमत मिळावी, त्यांना मुक्त अर्थव्यवस्थेचे फायदे खऱ्या अर्थाने घेता यावेत, यासाठी सरकारचा ठोस अजेंडा काय आहे? यापेक्षा यामागे काँग्रेस-राष्ट्रवादीचा हात आहे. या मुख्यमंत्र्यांच्या ‘पोरकट’ वक्तव्याला मोठं करण्याचे काम काही भाटांनी केले. समजा या संपामागे आणि मालाची नासाडी करण्यामागचे कारस्थान काँग्रेस-राष्ट्रवादीचे असे मानू. पण ज्या कारणांसाठी शेतकऱ्यांचा संप आहे त्याच्यावर सरकारची उपाययोजना काय ?

त्याचा जाब मुख्यमंत्र्याला विचारायचा नाही उलट किती गाड्या फोडल्या ? किती नुकसान झालं ? यासारखे बावळट प्रश्न विचारायचे. काही पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना स्वामीनाथन समितीच्या शिफारशींबाबत आणि कर्जमाफीबद्दल विचारलंही… पण हे “भाट साले” लगेच दुसरा प्रश्न मध्येच घुसवून पहिल्या प्रश्नाचे उत्तर कसे मागे पडेल याची दक्षता घेत होते.

 

आतापर्यंत  शेतकरी संघटनांकडून मागण्या वारंवार केल्या जात आहेत, पण आजवर त्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्यात आलेला नाही. त्यामुळे इतर अनेक वस्तूंचे भाव वाढत असताना आणि त्यातून उत्पादकांना चांगला नफा मिळत असताना शेतकऱ्यांना मात्र तोट्यात शेतमाल विकावा लागत आहे. निदान आता तरी या मागण्यांबाबत सरकारने सहानुभूतीपूर्वक विचार करुन शेतकरी वर्गाला दिलासा द्यावा, अशी अपेक्षा आहे. पण हे होताना दिसत नाही.

 

सरकारने नाशवंत शेतमालाच्या बाबतीत विविध समस्यांचा आणि प्रश्नांचा अभ्यास करुन या शेतमालाचे नुकसान टाळण्यासाठी आणि शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव मिळण्यासाठी तसेच उपाययोजना सुचविण्यासाठी एक समिती नेमली आहे. त्याच पुढं काय झालं ? असले प्रश्न कोणी उपस्थित करीत नाही.

 

परवाच शरद पवार यांनी सरकारच्या शेतकऱ्यांबद्दलच्या धोरणांबाबत प्रश्न उपस्थित केला. पण ते विरोधक म्हणून त्यांना महत्व द्यायचे नाही हे योग्य नाही. राज्यात फळबागांचे सुमारे साडेसात लाख हेक्टर तर भाजीपाला पिकाखाली  सात लाख हेक्टर क्षेत्र आहे. राज्यातील फळे व भाजीपाल्याचे उत्पादन अनुक्रमे 108 लाख टन व 115 लाख टन एवढे आहे. त्यापेक्षा अधिकही असेल. पण नाशवंत शेतमालाची काढणी, हाताळणी, शहरी भागात नाशवंत शेतमालाच्या विक्री व्यवस्थेचा अभाव, विक्री व्यवस्थेमधील दलालांची साखळी, कोल्डस्टोरेजचा अभाव या कारणांमुळे नाशवंत शेतमालाच्या एकुण उत्पादनापैकी सुमारे 25 ते 30% मालाची नासाडी होते, असे निदर्शनास आले आहे. त्यामुळे याबाबत अभ्यास करुन उपाययोजना सुचविण्यासाठी एक समिती स्थापन करून दोन महिन्यांत आपला अहवाल सरकारला सादर करणार होती. त्यावर कोणी मुख्यमंत्र्याला विचारत नाही.

 

याउलट शेतकऱ्यांचा संप म्हणजे जगातील एक भयानक प्रकरण असल्याची हवा निर्माण करायची. भाजीपाला, दूध रस्त्यावर ओतल्याचा इश्यू करायचा आणि वास्तव दडवायचे. अन्नधान्याची नासाडी आणि भूकबळीचा संदर्भ जोडायचा हे बरं नाही. शेतकऱ्याच्या कृती विरोधात वातावरण निर्माण करणाऱ्या भाटांच्या “ढुंगणात” चिखल गेला की मग शेती कळेल.

 

उगाच मुंबईत बसून बाता मारायच्या. शेतकऱ्यांनी रस्त्यावर ओतलेल्या दूधाची चर्चा करण्यापेक्षा कर्नाटकातल्या गोमटेश्वराच्या त्या दगडी मूर्तीवर जैन समाजाच्याकडून दुधाचा मस्तकाभिषेक दरवर्षी होतो. त्यावर चर्चा करावी. एका तरी पत्रकाराने त्या जैन समाजाच्या कृतीबद्दल दोन ओळी लिहल्याचे मला आठवत नाही. उलट शेतकरी आपली कोणी दखलच घेत नाही म्हणून लक्षवेधी कृत्याला प्राधान्य देतो.

पण एक एक पत्रपंडित शेतकऱ्यांनी जणू खून केल्याचा भास निर्माण करीत आहेत. अरे मूळ मुद्द्यांवर बोला. शेतकऱ्यांच्या मागण्या काय आहेत त्यावर दोन ओळी पहिल्या लिहा. मग दुधाची नासाडी बघू.

 

काहीजणानां तर हा संप म्हणजे गिरणी कामगारांच्या संपासारखा वाटू लागलाय. अरे यार तो संप कसला होता ? त्यात मालक आणि कामगार होता. इथं मालक शेतकरी आणि कामगारसुद्धा शेतकरी आहे. त्यामुळे या संपाला गिरणी कामगारांच्या संपाचा संदर्भ जोडू नये. सरकारी भाटांनी शेतकऱ्यांची काळजी करू नये, त्यापेक्षा मागण्या समजून घेवून त्याची पूर्तता करण्यासाठी सरकारवर कसा दबाव आणता येईल याची चिंता करावी. रस्त्यावर ओतलेल्या दुधाची आणि शेतमालाच्या नासाडीची चिंता या भाटांनी करू नये. ते शेतकरी बघून घेतील.

आणि हो…. ज्यांना चितळेच्या दुधाची पडली आहे त्यांनी पहिलं गाय, म्हैस, शेण, चारा समजून घ्यावा. शंभर वाट्यातलं ….एक वाट्याचं चितळेच दूध असतं. त्याच्या कित्येक पट गोकुळ आणि वारणा दुध संघाचे संकलन असते. त्यांनी काय नियोजन केलं आहे? ते राहिलं बाजूला, पण काहीजण चितळेची प्रतिक्रिया महत्वाची मानतात. “भाट साले…”

 

चंद्रकांत पाटील,

खारघर, नवी मुंबई

COMMENTS