…तर शेतकरी भाजप सरकारला इंगा दाखवतील- शरद पवार

…तर शेतकरी भाजप सरकारला इंगा दाखवतील- शरद पवार

पनवेलमध्ये संघर्षयात्रेचा समारोप

पनवेल (रायगड) – शेतकरी कर्जमाफीसाठी चंद्रपूर येथून निघालेली संघर्ष यात्रेचा आज (मंगळवार) पनवेलमध्ये समारोप झाला. या संघर्ष यात्रेच्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही सहभागी झाले.
यावेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, अबू आझमी, जोगेंद्र कवाडे, पृथ्वीराज चव्हाण, आमदार शशिकांत शिंदे, अशोक चव्हाण, आमदार जितेंद्र आव्हाड, राधाकृष्ण विखे पाटील, नारायण राणे, नितेश राणे आदी मान्यवर उपस्थित आहेत.

शेतकऱ्यांनो तुम्ही आत्महत्या करू नका. आम्ही या राज्यकर्त्यांचे जीणे हराम करू, असा निर्धार व्यक्त करून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शेतकऱ्यांना धीर दिला. भाजपने निवडणुकांपूर्वी कर्जमाफी करु असा शब्द दिला होता. मात्र, जेव्हा भाजप सत्तेत आला तेव्हा दिलेला शब्द पाळला नाही. पंतप्रधानांनीही असाच शब्द दिला होता. मात्र, त्यांनी तो शब्द पाळला नाही. भाजपचे सरकार आल्यावर दिलेला शब्द तंतोतंत पाळला असता तर असा संघर्ष करावा लागला नसता. दिलेला शब्द पाळायचा ही सरकारची इच्छा नाही. त्यामुळे शेतकरी आपला इंगा नक्कीच दाखवतील, असा घणाघात शरद पवार यांनी केला.

यावेळी बोलताना आव्हाड म्हणाले की, मरणाला आम्ही घाबरत नाही. तर निलंबनाचे काय घेऊन बसलात. आम्ही लोकांच्यातून निवडूण विधानसभेत आलो आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी शेवटपर्यंत लढत राहणार आहे

 

 

COMMENTS