तुकाराम मुंढेंचा आणखी एक दणका

तुकाराम मुंढेंचा आणखी एक दणका

पुणे – कार्यक्षम अधिकारी अशी ओळख असलेले तथा पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी आपल्या कारवाईचा धडाका कायम ठेवला आहे. तुकाराम मुंढे यांनी आज कामात दिरंगाई केल्याप्रकरणी भांडार अधिकारी चंद्रशेखर कदम यांना निलंबित केले आहे. त्यामुळे पीएमपीएमएलमधील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे.  

कदम यांच्यावर सुट्या भागांचा पुरवठा वेळेत न केल्याचा ठपका ठेवून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. नादुरुस्त असलेल्या 400 बस तातडीने रस्त्यावर आणण्याचे काम तुकाराम मुंढे यांनी हाती घेतले आहे. त्यासाठी त्याने वेगाने कामाला सुरुवात केली आहे. या कामात जो कोणी दिरंगाई करेल, त्याच्यावर कारवाईचा बडगा उचलण्यात येत आहे.

दरम्यान, 29 मार्चला PMPML चा कार्यभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांनी कामचुकार कामगारांवर कारवाई सुरु केली.  दोनच दिवसात म्हणजे 1 एप्रिलला त्यांनी पहिला झटका दिला. रात्री पुणे स्टेशन आणि कोथरुड डेपोमध्ये गाडयांच्या देखभाल दुरुस्तीच्या कामावर असलेले 9 कर्मचारी झोपल्याचं भरारी पथकाला आढळून आले. मात्र ही डुलकी या कर्मचाऱ्यांना महागात पडली. या 9 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश तुकाराम मुंढे यांनी दिले. शहरात एकूण 13 डेपो असून रात्रीच्या वेळेत झोपणाऱ्या कर्माचाऱ्यांवर कारवाईचे आदेश तुकाराम मुंढे यांनी प्रशासनास दिले होते. त्यासाठी त्यांनी भरारी पथके नेमली आहेत.

 

COMMENTS