तूर खरेदी केली तरी रडतात…. , दानवेंनी शिवी हासडली, दानवेंची जीभ पुन्हा घसरली

तूर खरेदी केली तरी रडतात…. , दानवेंनी शिवी हासडली, दानवेंची जीभ पुन्हा घसरली

‘राज्य सरकारने एवढी तूर खरेदी केली, तरी रडतात साले अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी असंवेदनशीलता उघड करुन दाखविली आहे. एकीकडे तूर खरेदी एरंडाच्या गुऱ्हाळासारखी झाली असल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आले आहे. अशा परिस्थीतीमध्ये भाजपचे नेते रावसाहेब दानवेंची कार्यकर्ता मेळाव्यात जीभ घसरल्याने चर्चेचा विषय झाला आहे.

भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात कार्यकर्त्याने भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब  दानवेंना तूर खरेदी बाबत लोकांना काय उत्तर द्यायचे असा प्रश्न केला. सरकारला आधीच या प्रश्नावरुन भंडावून सोडले असताना कार्यकर्त्यानेही हाच प्रश्न विचारल्याने दानवेंचा तिळपापड झाला अन् जीभ घसरली. यावेळी त्यांनी कापसाला, तुरीला, डाळीला भाव नाही असली रडगाणी बंद करा, राज्य सरकारने 1 लाख टन तूर खरेदी केली तरी लोक रडतात,  अशी शेतकऱ्यावर त्यांनी टीका केली. यावेळी तुरीचा प्रश्न विचारणाऱ्या कार्यकर्त्याला ही झापलं.

यापुर्वी रावसाहेब दानवे वादग्रस्त विधाने करुन चर्चेत आले होते. आता कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्याचे सोडून शेतकऱ्यांवर केलेल्या हीन टीकेमुळे त्यांनी राज्य सरकारला चांगलेच अडचणीत टाकले आहे.

COMMENTS