दाभोळकर, पानसरे यांची हत्येमागे नियोजनबद्ध कट – मुंबई हायकोर्ट

दाभोळकर, पानसरे यांची हत्येमागे नियोजनबद्ध कट – मुंबई हायकोर्ट

ज्येष्ठ विचारवंत गोंविद पानसरे आणि अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येमागे नियोजजित कट होता हे पुराव्यावरुन स्पष्ट दिसत आहे असं निरीक्षण मुंबई हायकोर्टानं नोंदवलं आहे. या हत्येमागे जे कुणी आहेत त्यांना आर्थिक पाठबळ कुणी दिले हे तपासण्यासाठी आर्थिक दृष्टीकोनातून तपास का केला नाही असा सवालही न्यायालयानं विचारला आहे.

सध्या तसाप सुरू असलेल्यापेक्षा याची व्याप्ती जास्त आहे. त्यादृष्टीने तपास करा आणि आरोपीपर्यंत पोहचा असा खडे बोल हायकोर्टाने तपास यंत्रणांना सुनावले आहेत. पानसरे आणि दाभोळकर हत्या प्रकरणाताचा तपासाचा अहवाल सीबीआय आणि सीआयडीने हायकोर्टा दाखल केला. त्यावर कोर्टाने हे निरीक्षण नोंदवले आहे.  हे कोणा एकट्या दुकट्याचं काम नाही मारेक-यांमागे कुठल्यातरी संस्थाचं पाठबळ असलं पाहिजे, त्यांना आर्थिक मदत पुरवली गेली असल्याची शक्यता आहे. या अहवालावरुन तरी असेच दिसत आहे असंही कोर्टानं म्हटलं आहे.

सीबीआयनं सारंग अकोलकर, आणि विनय पवार हे दोन मारेकरी असल्याचा दावा केला आहे. मात्र ते अजून का सापडत नाहीत. एवढे दिवस ते दडून राहणं शक्य नाही. सीआयडीसोबत योग्य प्रकारे समन्वय साधा आणि त्यांना पकडा. अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करा असंही न्यायालयानं सुचवलं आहे.

COMMENTS