दिव्यांगांना लोकलमध्ये चढू द्या, शॉर्ट फिल्ममधून जनजागृती

दिव्यांगांना लोकलमध्ये चढू द्या, शॉर्ट फिल्ममधून जनजागृती

मुंबई – लोकल ट्रेनची ओळख मुंबईची जीवन वाहिनी आहे. दिवसेंदिवस लोकलने प्रवास करणा-यांची संख्या वाढत आहे. सकाळ असो दुपार असो की संध्याकाळ प्रत्येक लोकल ही तुडुंब भरलेली असते. धडधाकट माणसांनाही अगदी डब्यात चढणही मुश्किल होत. त्यामुळे अनेक प्रवासी हे दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या डब्यात चढतात. खरतंतर अशा डब्यात चढणं चुकीचं तर आहेच पण कायद्यानुसारही गुन्हा आहे. अशा प्रवाशांवर कारवाईही केली जाते. मात्र ती तोकडीच पडते. त्यामुळे दिव्यांगांना लोकलमधून प्रवास करणे लोकलमध्ये चढणेही मुश्किल होईन जाते.  यावर उपाय म्हणून प्रवाशांमध्येच जणजागृती करण्यासाठी एक शॉर्ट फिल्म बनवण्यात आली आहे. पत्रकार, आरपीएफ आणि प्रहार रेल्वे अपंग संघटना यांच्या साहाय्याने तयार केलेल्या या फिल्मचं लोकार्पण आरपीएफचे आयजी अतुलकुमार श्रीवास्तव आणि प्रहार संघटनेचे संस्थापक आमदार बच्चू कडू यांच्या हस्ते छत्रपती टर्मिनस येथील आरपीएफ मुख्यालयात करण्यात आलं.

 

लोकार्पण व्हिडिओ

प्रहार संघटनेचे संस्थापक आमदार बच्चू कडू यांची प्रतिक्रीया

आरपीएफचे आयजी अतुलकुमार श्रीवास्तव यांची प्रतिक्रीया

COMMENTS