नंदूरबार – शहादामध्ये तुफान हाणामारीत नगरसेवकाचा मृत्यू !

नंदूरबार – शहादामध्ये तुफान हाणामारीत नगरसेवकाचा मृत्यू !

शहादामध्ये दोन गटात झालेल्या हाणामारीत एमआयएमचे नगरसेवक सदाम तेली यांचा मृत्यू झालाय. शहादामध्ये झालेल्या हाणामारीत  तेली हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना धुळ्याच्या हिरे मेडिकलमध्ये हलवण्यात आलं होतं. तिथंच त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.  त्यानंतर तेली यांच्या समर्थकांनी गरीब नवाज कॉलनीत तुफान दडफेक आणि जाळपोळ केली. संतप्त जमावाने पोलिसांच्या गाडीचीही तोडफोड केली. सध्या परिस्थिती तणावपूर्ण मात्र नियंत्रणात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

COMMENTS