नव्या संघटनेची स्थापना केल्यानंतर काय म्हणाले सदाभाऊ? वाचा सदाभाऊंच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

नव्या संघटनेची स्थापना केल्यानंतर काय म्हणाले सदाभाऊ? वाचा सदाभाऊंच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

कोल्हापुर –  मी माझ्या आयुष्याचा नवा अध्याय सुरू करतोय… त्यासाठी मला शक्ती दे…. असे अंबाबाईच्या चरणी सदाभाऊ खोत यांनी मागण मागितलं आहे. शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारी आपली संघटना असेल. वेळप्रसंगी सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधातही आपण आवाज उठवणार असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.
महाराष्ट्रातील 353 तालुक्यात सदभाऊ यांची संघटना असेन प्रत्येक तालुक्यात 5 हजार कार्येकर्ते तयार करणार आहोत. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी वेगळी चूल मांडल्यानंतर त्यांच्यासोबत कोण जाणार याची खलबते सुरू आहेत. यावर बोलताना खोत यांनी जे कार्यकर्ते आपल्या सोबत येतील त्यांना सामावून आपण पुढे जाणार असल्याचे म्हटले आहे. कर्जमुक्ती मिळवून घेतली तर त्याच्या दुकानदाऱ्या कशा चालणार. असा टोला सदाभाउ खोत यांनी खासदार राजु शेट्टी यांना लगावला.

दिवंगत शेतकरी नेते शरद जोशी आपले एकमात्र गुरु असल्याचे सांगत, शेती प्रश्नांवर लढण्यासाठी त्यांनीच वैचारीक पायाभरणी केली आहे. त्यामुळे संघटनेचा बिल्ला आपल्या छातीवर कायम असेल असे खोत यांनी म्हटले आहे. पुढच्या महिन्यात मुंबईला मेळावा घेणार असल्याच ही त्यांनी सांगितले.

COMMENTS