नांदेड जिल्हा परिषदेत काँग्रेस- राष्ट्रवादीची आघाडी

नांदेड जिल्हा परिषदेत काँग्रेस- राष्ट्रवादीची आघाडी

नांदेड जिल्हा परिषदेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे. काँग्रेसचा अध्यक्ष तर उपाध्यक्ष राष्ट्रवादीचा असणार आहे. काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांच्या बैठकीत आघाडीवर शिकामोर्तब करण्यात आला.

जिल्हा परिषदांमध्ये भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेची मदत घेण्याची तयारी काँग्रेसने दाखवलीये. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी तसे स्पष्ट संकेत दिले आहे.  जिल्हा परिषदांमध्ये अनेक ठिकाणी भाजपनं चांगलं यश मिळवलंय. मात्र सत्तास्थापनेच्या गणितात त्यांना शिवसेना किंवा इतर पक्षांची मदत लागणार आहे. काँग्रेसनं अशा ठिकाणी शिवसेनेला साथ देऊन भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याची रणनिती आखलीये. ज्या ठिकाणी भाजपला सत्तेपासून दूर ठेवता येईल अशा ठिकाणी काँग्रेस शिवसेनेला मदत करण्यासाठी तयार झालीये. भाजपला जिल्ह्यात चांगलं यश मिळूनसुद्धा शिवसेनेच्या तिरक्या चालीनं भाजपला सत्तेपासून दूर ठेवले आहे.

COMMENTS