नाना अंबोले यांची भाजपच्या मुंबई उपाध्यक्षपदी निवड

नाना अंबोले यांची भाजपच्या मुंबई उपाध्यक्षपदी निवड

मुंबई – लालबाग परळ या शिवसेनच्या बालेकिल्ल्यात ताकद वाढवण्यासाठी भाजपनं आता पावलं उचलण्यास सुरूवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून शिवसेनेतून नुकतेच भाजपमध्ये आलेले संजय अंबोल यांची पक्षानं मुंबईच्या उपाध्यक्षपदी निवड केलीय. स्थानिक आमदार अजय चौधरी यांच्याशी मतभेद झाल्यामुळे अंबोले यांनी महापालिका निवडणुकीच्या आधी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत भाजपमध्ये प्रवेश केला होता. संजय अंबोले यांच्या पत्नी भाजपाच्या तिकीटावर महापालिकेच्या रिंगणात होत्या. मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. मात्र त्यातून सावरुन अंबोले यांनी आता मराठी पट्ट्यात पक्षाच्या बांधणीकडे लक्ष दिले आहे. भाजपकडे या भागात दुसरा एवढा तोलामोलाचा नेता नसल्यामुळे अंबोले यांच्याच पाठिशी ताकद उभा करण्याचा निर्णय घेतलाय. 2019 मध्ये नाना अंबोले हे शिवडी मतदारसंघातून भाजपचे उमेदवार असतील असंही बोलंलं जातंय. त्यापार्श्वभूमीवर या निवडीकडे पाहिलं जातंय. त्यामुळे आता आगामी काळात नाना अंबोले शिवडीत कमळ फुलवतात की बाण त्यांना घायाळ करतो हे पहावं लागेल.

COMMENTS