नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाच्या उलट सुलट चर्चांना उधाण !

नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाच्या उलट सुलट चर्चांना उधाण !

नारायण राणे आजच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं वृत्त मुंबई लाईव्ह या बेवसाईटने दिले आहे, भाजपची ओडिशातील भुवनेश्वरमध्ये दोन दिवसांची राष्ट्रीय कार्यकारणची बैठक सुरू आहे. या बैठकीचा आज समारोप होत आहे. तिथेच नारायण राणे आपल्या दोन मुलांसह भाजपमध्ये प्रवेश करणार अससल्याचं मुंबई लाईव्ह या वेबसाईटने म्हटलं आहे. तर दुसरीकडे भाजपने राणेंचा प्रवेश होल्डवर ठेवल्याचं एबीपी माझा या वाहिनीने म्हटले आहे.

राणेंच्या प्रवेशावरुन भाजपमध्ये दोन गट पडलेत. राणेंना पक्षात घेतलं तर पक्षात ते आपल्याला डोईजड होतील असं एका गटाचं म्हणणंय.. विशेष म्हणजे मुख्यमंत्री या गटाचं नेतृत्व करत असल्याचं बोललं जातंय..पण सद्य स्थितीत राणेंना राष्ट्रपती निवडणुकीपर्यंत तरी प्रवेश देऊ नये असं काही नेत्यांचं म्हणणंय..एनडीएच्या बैठकीनंतर सेना भाजपमधले ताणलेले संबंध सुधारलेत..त्यात राणेंना प्रवेश दिला तर सेना अस्वस्थ होण्याची शक्यताय..तसं झाल्यास राष्ट्रपती निवडणुकीत भाजपला अडचण येऊ शकते..सेनेकडे असलेल़्या २५ हजार मतांची गरज भाजपला त्यांच्या पसंतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी पाहिजेत..त्यामुळं राणे यांच्या प्रवेशामुळं सेनेबरोबरचे संबंध दुखावले जाऊ नये यासाठी भाजप हळूवार पावलं उचलताना दिसत आहे..त्यात राणेंबाबतच्या चर्चेनंतर सेनेनं वेट अँड वॉचची भूमिका घेतलीय..तसंच सेना नेत्यांना याबाबत बोलण्यास नकार दिलाय..त्यामुळं राणेंचा भाजप प्रवेश राष्ट्रपती निवडणुकीपर्यंत लांबणीवर पडण्याची शक्यता आहे अशीची चर्चा आहे.

COMMENTS