नारायण राणे राजकीय भूकंप घडवण्याच्या तयारीत !

नारायण राणे राजकीय भूकंप घडवण्याच्या तयारीत !

ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप घडवण्याच्या तयारीत आहेत. नारायण राणे सोमवारी रात्री दिल्लीत दाखल झाले आहेत. ते मंगळवारी भाजपच्या नेत्यांच्या भेटीगाटी घेण्याची शक्यता असून लवकरच ते भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. गेले काही दिवस राणे काँग्रेसमध्ये नाराज आहेत. आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला डावलंल जायंत असं गेल्याच आठवड्यात त्यांनी सांगितलं होतं. राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांवर त्यांनी टीका केली होती.  काही दिवसांपूर्वी राणे यांचे चिरंजीव निलेश राणे यांनी काँग्रेसच्या सरचिटणीसपदाचा राजीनामा देत थेट अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा साधला होता. त्यामुळेच राणे काँग्रेस सोडून शिवसेना किंवा भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होती. आता राणे यांनी भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय जवळपास निश्चित केल्याचं बोललं जातंय. राणे भाजपात गेल्यास त्यांचा राज्यमंत्रीमंडळात समावेश करुन त्यांना महत्वाचं खातं  दिलं जाणार असल्याचीची चर्चा आहे. मात्र त्यांचे दुसरे पुत्र विद्यमान आमदार नितेश राणे यांनी महाराष्ट्र भूषण पुरस्कारावरुन बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर तिखट टीका केली होती. त्यामुळे राणे त्यांची भूमिका सोडणार की भाजप त्यांच्या भूमिकेसह त्यांना स्विकारणार याकडंही सगळ्यांचं लक्ष लागलंय.

COMMENTS