बच्चू कडूंच्या निषेधार्थ नाशिक महापालिकेत कर्मचाऱ्यांचे ‘लेखणी बंद’ आंदोलन

बच्चू कडूंच्या निषेधार्थ नाशिक महापालिकेत कर्मचाऱ्यांचे ‘लेखणी बंद’ आंदोलन

नाशिक महापालिका अधिकारी आणि कर्मचारी यांनी आज लेखणी बंद आंदोलन केले आहे. महापालिका प्रवेशद्वारवर कामगार आंदोलन करीत आहे. महापौर रंजना भानसी, भाजप-शिवसेना पदाधिकारी उपस्थित आहेत. यावेळी आमदार बच्चू कडू यांचा निषेध करण्यात आला.   सोमवारी (दि.24) नाशिकच्या मनपा आयुक्तांवर हात उगारल्याप्रकरणी आणि सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात आज नाशिक महापालिका अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून लेखणी बंद आंदोलन करण्यात आले आहे.

नाशिकच्या मनपा आयुक्तांवर हात उगारल्याप्रकरणी आणि सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी आमदार बच्चू कडू यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर कडू यांना कोर्टात हजर केले असता जामीन मंजूर करण्यात आला.

नाशिक महापालिकेने 1995 चा अपंग पुनर्वसन कायदा अद्याप अंमलात आणला नाही. तसेच अपंगांचा राखीव तीन टक्के निधी आजपर्यंत खर्च केला जात नसल्यामुळे मनपा मुख्यालयासमोर  सोमवारी धरणे आंदोलन करण्यात आले होते. प्रहार संघटनेच्या नेतृत्त्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनाचे नेतृत्त्व करणारे आमदार बच्चू कडू यांनी शिष्टमंडळासमवेत महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या शाब्दिक वादानंतर कडू त्यांनी आयुक्त कृष्ण यांच्यावर हात उगारला होता. त्यानंतर आमदार बच्चू कडू यांना अटक करण्यात आली होती. बच्चू कडू यांना कोर्टात हजर केले असता त्यांना जामीन देण्यात आला आहे. मात्र, दर शनिवारी पोलिस ठाण्यात हजर राहावे, असे निर्देशही कोर्टाने दिले आहे.

COMMENTS