नोटबंदी म्हणज्ये काळा पैसा पांढरा करण्याची आजपर्य़ंतची सर्वात मोठी स्कीम – अरुण शौरी

नोटबंदी म्हणज्ये काळा पैसा पांढरा करण्याची आजपर्य़ंतची सर्वात मोठी स्कीम – अरुण शौरी

नवी दिल्ली – आर्थिक धोरणांवरुन अडचणीत आलेल्या मोदी सरकारवर स्वपक्षातूनच हल्लाबोल थांबण्याचं नाव घेत नाही. अटलबिहारी वाजपेयी मंत्रीमंडळातील माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी गेल्याच आठवड्यात मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवर जोरदार हल्लाबोल केला होता. त्याला भाजपचे ज्येष्ठ खासदार शुत्रुघ्न सिन्हा यांनी पाठिंबा दिला होता. तो वाद शमतो ना शमतो तोच आता वाजपेयी सरकारच्या मंत्रीमंडळातील माजी मंत्री अरुण शौरी यांनी अत्यंत कठोर भाषेत मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवर हल्ला चढवला आहे. एनडीटीव्ही या चॅलनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये अरुण शौरी यांनी ही टीका केली आहे.

            मोदी सरकारचा नोटबंदीचा निर्णय म्हणजे काळा पैसा पांढरा करण्याची इतिहासातील आजपर्यंतची सर्वात मोठी स्कीम आहे अशा शब्दात शौरी यांनी मोदी सरकारला फैलावर घेतलं आहे. आरबीआयनं जुन्या 99 टक्के नोटा जमा झाल्याचं आपल्या अहवालात म्हटलं आहे. हा अहवाल म्हणजे काळा पैसा पांढरा करण्याची स्कीमचा पुरावाच असल्याचं शौरी यांनी सांगितलं. केंद्रात केवळ अडीच लोकांचं राज्य आहे. ते कोणत्याही तज्ज्ञांचं ऐकत नाहीत असंही शौरी म्हणाले.

          जीएसटीची अंमलबाजवणी करण्याचीही या सरकारने खूप घाई केली. त्यामुळे देश मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे असंही शौरी म्हणाले. जीएसटी लागू करायला सरकारनं एवढी घाई केली की इन्फोसिसला जीएसटी सॉफ्टवेअरची ट्रायल घ्यायला पण वेळ मिळाला नाही असा आरोपही शौरी यांनी केला आहे. जीएसटीबाबत सरकारने तीन महिन्यात सात नियम बदलल्याचंही त्यांनी सांगितलं. या निर्णयाचा विपरीत परिणाम छोट्या उद्योगांवर होत असल्याचं शौरी म्हणाले.

COMMENTS