“पंकजा ताईंसोबत भगवानगडावर जाणार”

“पंकजा ताईंसोबत भगवानगडावर जाणार”

अहमदनगर – ‘पंकजा मुंडेसोबत भगवानगडावर जाऊन दर्शन घेणार.’ असं वक्तव्य पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांनी केले आहे. ते अहमदनगरमध्ये बोलत होते.

दसरा मेळावा होईल की नाही, याबाबतही अजून संभ्रम आहे. मात्र दसऱ्याला गडावर जाऊ, भाषणही करु, असे महादेव जानकर यांनी म्हटले आहे. दुसरीकडे दसरा मेळाव्याबाबत संभ्रमात असल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. तर दसरा मेळावा घेण्यासाठी राज्यभरातील मुंडे समर्थक आक्रमक आहेत. विविध ठिकाणी पंकजा मुंडेंना भेटून दसरा मेळावा घेण्यासाठी निवेदन दिले जात आहे.

दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे गेल्या अनेक वर्षांपासून अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील भगवानगडावर दसरा मेळाव्यात समर्थकांना संबोधित करायचे. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर ही परंपरा त्यांची मुलगी पंकजा मुंडे यांनी चालू ठेवली. मात्र गडाचे मठाधिपती नामदेव शास्त्री यांनी भगवान गडावर दसरा मेळावा यापुढे होणार नाही, अशी भूमिका गेल्या वर्षीपासून घेतली. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.

COMMENTS