पंकजा मुंडे यांच्या ‘राॅयलस्टोन’ निवासस्थानी ‘श्री’ चे उत्साहात आगमन

पंकजा मुंडे यांच्या ‘राॅयलस्टोन’ निवासस्थानी ‘श्री’ चे उत्साहात आगमन

मुंबई – राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांच्या राॅयलस्टोन या शासकीय निवासस्थानी आज गणरायाचे उत्साहात आगमन झाले. पंकजा मुंडे व त्यांचे पती डाॅ. अमित पालवे यांनी ‘श्रीं ‘ ची पूजा करून करून आशीर्वाद घेतले.

प्रतिवर्षी परंपरे प्रमाणे यंदाही पंकजाताई मुंडे यांच्या निवासस्थानी आज सकाळी श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली. पंकजाताई मुंडे, डाॅ. अमित पालवे यांनी गणरायाची यथासांग पूजा केली.  याप्रसंगी प्रज्ञाताई मुंडे, अॅड. यशःश्री मुंडे, आर्यमान पालवे आदी उपस्थित होते.

गणपतीची अतिशय देखणी व सुबक अशी मुर्ती आणि त्यासमोर मांडलेली विविध प्रकारच्या फुलांची आरास यामुळे वातावरण यावेळी अगदी भक्तीमय झाले होते. राज्यातील नागरिकांची विघ्ने दूर व्हावीत तसेच मराठवाडा, विदर्भात अपुऱ्या पावसामुळे बळीराजावर आलेले संकट दूर होऊन भरपूर पाऊस पडू दे अशी प्रार्थना ना. पंकजाताई मुंडेंनी यावेळी गणरायाकडे केली.

COMMENTS