पंतप्रधान का होऊ शकलो नाही ?  वाचा शरद पवारांनी  सांगितलेली कारणे 

पंतप्रधान का होऊ शकलो नाही ?  वाचा शरद पवारांनी  सांगितलेली कारणे 

नाशिक – शरद पवार यांच्या राजकीय कारकिर्दिला 50 वर्ष झाल्याच्या निमित्ताने  काल नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. यावेळी त्यांना विविध प्रश्न विचारण्यात ले. त्यावेळी प्रसिद्ध मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी आपण पंतप्रधान कोणत्या मर्यादा आल्या असा प्रश्न केला. त्यावर शरद पवार यांनी अप्रत्यक्षपणे राजीव गांधी आणि त्यानंतर सोनिया गांधी यांच्या नेतृत्वावर टीका केली. आपल्यावर पंडित नेहरु, इंदिरा गांधी आणि यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा प्रभाव होता. त्यामुळे आपण काँग्रेस पक्षात असताना आपली मते स्वच्छ आणि प्रामाणिकपणे मांडली. त्याचा आपल्याला राजकीय तोटा आपल्याला झाला असंही पवार म्हणाले.  पंतप्रधानपद मिळवण्यासाठी केवळ  पात्रता आणि क्षमता असून चालत नाही. तर तुम्हाला  राजकीय पाठबळ मिळायला हवे. मात्र ते आपण मिळवू शकलो नाही. त्यामुळे त्या पदापर्यंत पोहचलो नाही असंही पवार यांनी सांगितलं. थोडक्यात आपण इंदिरा गांधी यांच्यानंतरच्या नेत्यांचा विश्वास संपादन करु शकलो नाही आणि आपण त्यांची हुजरेगिरी  केली नाही त्यामुळे आपण या पदापर्य़ंत पोहचू शकलो नाही असंच पवार यांना यातून सुचवायचं होतं.

COMMENTS