पंतप्रधान मोदी तीन देशांच्या दौऱ्यासाठी रवाना

पंतप्रधान मोदी तीन देशांच्या दौऱ्यासाठी रवाना

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (शनिवारी) पासून 4 दिवसीय परदेश दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. मोदी पोर्तुगाल, अमेरिका आणि नेदरलँड या देशांना भेट देणार आहेत.

पंतप्रधान मोदी हे शनिवारी पोर्तुगालला भेट देतील. त्यानंतर 27 जून रोजी ते अमेरिकेला भेट देणार आहेत. त्यानंतर ते नेदरलॅंडला जाण्याची शक्‍यता आहे. अमेरिकेत मागील वर्षी निवडणुका पार पाडल्यानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी मोदींची ही पहिलीच भेट असणार आहे, अशी माहिती परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते गोपाल बागले यांनी दिली आहे.

COMMENTS