पद वाचवण्यासाठी मातृत्व नाकारणाऱ्या महिलेची पोलखोल

पद वाचवण्यासाठी मातृत्व नाकारणाऱ्या महिलेची पोलखोल

राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी राजकीय लोक कोणत्या थरापर्यंत जाऊ शकतात याच काही नेम नाही… नाशिक ग्राम पंचायत सदस्य असलेल्या महिलेने आपले पद वाचवण्यासाठी केलेली बनवाबनवी उघड झाली आहे. पदासाठी तिसरे मूल आपले अपत्य नसल्याचे या महिलेने  सांगितले होते. मात्र हा सर्व प्रकार उघडकीस आला असून सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी तिला चांगलेच फटकारले आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्यासाठी दोनपेक्षा जास्त अपत्य असणाऱ्या व्यक्तींना उमेदवारी मिळत नाही . मात्र या महिलेला तीन अपत्य आहे. मात्र नियमात बसण्यासाठी या महिलेने आपले दोनच अपत्य दाखवत निवडणूक लढवली आणि या निवडणूकीत विजय सुद्धा झाला. मात्र विरोधी उमेदवाराने या महिलेला तीन मुलं असल्याची निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. यानंतर आयोगाने याची चौकशी केली असता ही बाब खरी असल्याचं समोर आल्याने तिचे सदस्यत्व रद्द करण्यात आले.

आपलं सद्सत्व पुन्हा मिळविण्यासाठी याविरोधात महिलेने मुंबई उच्च न्यायालयाचे दार ठोठावले. मात्र तिथेही न्याय मिळाले नाही. त्यामुळं तिने सर्वोच न्यायालयात धाव घेतली. यांनतर तिचे आणि तिसऱ्या मुलाचे डीएनए टेस्ट घेतले असता तो तिचाच मुलगा असल्याचं स्पष्ट झाल्याने न्यायालयाने या महिलेची याचिका फेटाळून लावली.

 

 

COMMENTS