“पवार साहेब, मी तुमच्याच सोबत आहे, कुठेही जाणार नाही”

“पवार साहेब, मी तुमच्याच सोबत आहे, कुठेही जाणार नाही”

 

नवी  मुंबई  –  माथाडी कामगारांचे नेते अण्णासाहेब पाटी यांच्या 84 व्या जयंतीनिमित्त आज नवी मुंबईत माथाडी कामगारांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार होता. मात्र काही कामांमुळे मुख्यमंत्री या कार्यक्रमाला आले नाहीत.

या कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार नरेंद्र पाटील यांनी त्यांच्याबद्दल सुरू असलेल्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना विराम दिला. या व्यासपीठावर सर्वच पक्षाचे मख्यमंत्री आले, विरोधी पक्षांचे नेतेही आले. मनोहर जोशी आले होते, गोपीनाथ मुंडे आले होते याचीही आठवण नरेंद्र पाटील यांनी करुन दिली. मग आताच्या मुख्यमंत्री फडणवीसांना बोलवल्यावरच माझ्या पक्ष बदलाच्या चर्चा का होत आहेत ? असा सवालही त्यांनी केला. माथाडी कामकारांच्या काही समस्या सोडवल्या जात असतील तर मुख्यमंत्र्यांचा सत्कार का करायचा नाही असंही पाटील म्हणाले. पवार साहेब मी तुमच्याच बरोबर आहे. कुठेही जाणार नाही असंही त्यांनी यावेळी सांगितलं. यावेळी त्यांनी काँग्रेस पक्ष आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरही जोरदार टीका केली.

COMMENTS