पाशा पटेल यांची कृषीमुल्य आयोगाच्या अध्यक्षपदी निवड

पाशा पटेल यांची कृषीमुल्य आयोगाच्या अध्यक्षपदी निवड

मुंबई – भाजपचे शेतकरी नेते पाशा पटेल यांची राज्य कृषीमुल्य आयोगाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही निवड केली. त्यांच्या निवडीचं पत्र आज पाशा पटेल यांना देण्यात आलं. यावेळी कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर उपस्थित होते. शेतकरी संघटनेत असलेले पाशा पटेल हे काही वर्षांपूर्वी भाजपात आले होते. ते  स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक समजले जात होते. त्यांना शेतीचा प्रदीर्घ अनुभव आणि अभ्यास आहे. त्यांच्या निवडीने शेतक-यांच्या मालाला चांगला भाव मिळण्यास मदत होईल अशी आशा करायला हरकत नाही. ही निवड करुन भाजप सरकारने त्यांचे  एकप्रकारे राजकीय पुर्ववसन केले आहे. दोन वेळा त्यांना विधान परिषदेच्या आमदारकीनं हुलकावनी दिली होती.  गोपीनाथ मुंडे यांच्या  निधनानंतर त्यांच पंकजा मुुंडे यांच्याशी फारसं ट्युनिंग जुळलं नाही. त्यामळे ते मुख्यमंत्र्यांच्या गोटात शिरले. तसंच कर्जमाफीवरुन सरकावर हल्ले होत असताना, शेतक-री संपावर गेला होता  तेंव्हा त्यांनी सरकारची बाजू जोरकसपणे मांडण्याचा प्रयत्न केला होता. त्याचं फळ त्यांना मिळालं असं म्हणावं लागेल.

COMMENTS