पिंपरी महापालिका स्थायी समिती अध्यक्षपदी भाजपच्या सीमा सावळे

पिंपरी महापालिका स्थायी समिती अध्यक्षपदी भाजपच्या सीमा सावळे

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी भाजपच्या नगरसेविका सीमा सावळे यांची  आज बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी महापौर नितीन काळजे, उपमहापौर शैलजा मोरे, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, माजी खासदार गजानन बाबर, माजी महापौर आझम पानसरे, शकुंतला धराडे, विरोधी पक्षनेते योगेश बहल, माजी नगरसेवक शंकर जगताप, भाजप उपाध्यक्ष सदाशीव खाडे, सारंग कामतेकर आदी उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी भाजपतर्फे सीमा सावळे यांचा एकमेव अर्ज भरला गेल्यामुळे स्थायी समितीवर सावळे यांची बिनविरोध निवड झाली. संख्याबळ जास्त नसल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी अर्ज भरला नव्हता.

 

COMMENTS