पीक विम्याची रक्कम कपात होत असल्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात असंतोष !

पीक विम्याची रक्कम कपात होत असल्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात असंतोष !

उस्मानाबाद – जिल्हा बँकेची आर्थिक स्थिती बघडल्यानंतर किरकोळ डागडुजी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. जिल्ह्यातील अनेक ठेवीदारांच्या ठेवी बँकेत अडकल्या आहेत. दररोज शेकडो कर्जदार बँकेच्या दारात पैशासाठी येत आहेत. त्यांच्या मुदत ठेवीचा कालावधी संपूण गेला आहे. रकमेअभावी अनेकांच्या घरातील नातेवाईकांचे लग्न मोडले आहेत. तरीही बँकेला ठेवीदारांचे पैसे देता येत नाहीत. त्यासाठी थकीत कर्जदारांचे पैसे वसूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. वास्तविक थकीत कर्जदारांची संख्या अगदीच किरकोळ आहे. त्यामुळे त्यातून मिळणारी रक्कम अगदीच थोडकी आहे. तरीही थकीत कर्जबाजारी शेतकऱ्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील वातावरण ढवळून निघाले आहे. शेतकरी बँकेच्या कारभारावर नाराजी व्यक्त करीत आहेत. वास्तविक तेरणा आणि तुळजाभवानी साखर कारखान्याकडे 400 कोटीपर्यंत थकले आहे. त्यामुळे बँकेची आर्थिक कोडी झाली आहे. जोपर्यंत हे दोन्ही साखर कारखाने भाडेतत्त्वावर दिर्घ कालावधीसाठी चालवायला दिले जाणार नाहीत. तोपर्यंत बँकेची स्थिती पूर्वपदावर येणे अशक्य दिसत आहे. एकीकडे डाॅ. पद्मसिंह पाटील यांचे भाचे अमोल पाटोदेकर यांच्या संस्थेकडे बँकेचे कर्ज आहे. त्यांच्याकडून थकीत कर्जाची वसुली होत नाही. पण, दुसरीकडे सामान्य शेतकऱ्यांच्या पिकविम्याची रक्कम थकीत कर्जापोटी कपात केली जात आहे. त्यामुळे बँकेवर सत्ता असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यावर ग्रामीण भागात रोष व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांना विमा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणारे आमदार आता का शांत बसले आहेत. असा प्रश्न शेतकरी वर्गातून विचारला जात आहेत.

COMMENTS