पीक विम्याच्या रांगेत शेतक-याचा मृत्यू !

पीक विम्याच्या रांगेत शेतक-याचा मृत्यू !

नांदेड, 30 जुलै – पीकविमा भरण्यासाठी 31 जुलै ही शेवटी मुदत आहे. मात्र बँकांमध्ये ही प्रक्रिया अत्यंत संथ गतीने सुरू असल्यामुळे अनेक शेतकरी पीकविमा भरु शकलेले नाहीत. त्यामुळे सध्या बँकांच्या समोर पीकविमा भरण्यासाठी शेतक-यांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. असंच रांगेत उभं राहणं नांदेड जिल्ह्यातल्या एका शेतक-याच्या जीवावर बेतलं. भोकर तालुक्यातील किनी या गावातील एसबीआयच्या शाखेवर रामा लक्ष्मण पातेरे हे शेतकरी  विमा भरण्यासाठी आले होते. ती भली मोठी रांग होती. त्यामुळे रामा हे रांगेत उभे राहिले. रांगेत उभे असताना त्यांना चक्कर आली आणि ते जमीनीवर कोसळले. त्यांना तातडीने जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं. तिथे प्राथमिक उपचार करुन त्यांना  भोकरच्या ग्रामिण रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र तिथे नेत असतानाच त्यांना मृत्यू झाला. या प्रकारामुळे आणि पीक विम्याच्या दिरंगाईमुळे शेतक-यांमध्ये संतापाचं वातावरण आहे.

COMMENTS