पुण्याचे उपमहापौर नवनाथ कांबळे यांचं निधन

पुण्याचे उपमहापौर नवनाथ कांबळे यांचं निधन

पुणे – पुणे महानगरपालिकेचे उपमहापौर नवनाथ कांबळे यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने आज (मंगळवारी) निधन झाले.

कांबळे सकाळी गार्डनमध्ये फिरायला गेले होते. त्यावेळी त्यांना अचानक छातीत त्रास होऊ लागला. त्यांना तात्काळ जवळच असलेल्या रुग्णवाहिकेमधून रुबी हॉलमध्ये दाखल करण्यात आले होते.

नवनाथ कांबळे हे रिपाइंचे ज्येष्ठ कार्यकर्ते असून दलित पँथरमध्येही त्यांचा सक्रिय सहभाग होता. सन 1997 मध्ये ते प्रथम नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर सन 2002 मध्ये झालेल्या त्रिदस्यीय प्रभाग पद्धतीमध्ये प्रभाग क्रमांक चौदा (किलरेस्कर न्यूमॅटिक कंपनी) या प्रभागातून ते विजयी झाले होते. निवडून आल्यानंतर शहर सुधारणा समितीचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. रिपाइंचे शहराध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते.

COMMENTS