फी वाढी विरोधात पुण्यानंतर मुंबईतील पालक आंदोलनाच्या पवित्र्यात, युवा सेना होणार सहभागी

फी वाढी विरोधात पुण्यानंतर मुंबईतील पालक आंदोलनाच्या पवित्र्यात, युवा सेना होणार सहभागी

शाळांमध्ये बेकायदेशीरपणे होणाऱ्या फी वाढी विरोधात पालकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. यातचं आता मुंबईतले पालक देखील आक्रमक झाले असून 21 तारखेला भव्य आंदोलनाचे नियोजन करण्यात येत आहे. 

शाळांच्या फी वाढीविरोधात पुण्यात विनोद तावडेंना पालकांनी घेराव घातला होता. त्यावेळी या विषयाबाबत पुन्हा सुनावणी घेऊ, असं आश्वासन देऊन विनोद तावडे निघून गेले होते. तरी अजून पर्यत एकाही शाळेवर कारवाई करण्यात आली नाही. अनेक पालकांचे प्रवेश रखडले आहे.

शिक्षण विभागाकडून केवळ आश्वासन दिली जात असून एकाही शाळाने फी कमी केलेली नाही असा पालकांचा आरोप आहे. त्यामुळे आता पालकांनी आंदोलन करण्याच्या निर्णय घेतला असून या आंदोलनाला युवा सेनेचा पाठिंबा आहे. आंदोलनात युवा सेनाही सहभागी होणार आहे.

दरम्यान, पालकांनी आक्रमकपणे शुल्कवाढीला विरोध केला. मात्र शुल्कवाढ कायम ठेवल्याने पालक आक्रमक झाले आहेत. तावडे यांनी सुनावणीसाठी मुंबईला बोलवून आमची फसवणूक केल्याचा आरोप पालकांनी केला आहे.

COMMENTS