पुन्हा सत्ता हवी आहे, मग “हे” करा, पवारांचा फडणवीसांना कानमंत्र !

पुन्हा सत्ता हवी आहे, मग “हे” करा, पवारांचा फडणवीसांना कानमंत्र !

अहमदनगर – देवेंद्र फडणवीसांना पुन्हा सत्ता मिळावयची असेल तर त्यांनी ‘फिटलं’ असं म्हणावं असा कानमंत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. चक्क विजयासाठीचा हा फॉर्म्युला आपल्या विरोधकांना शरद पवारांनी सांगितला आहे. तुम्ही शेतक-यांना फिटलं असं आश्वासन द्या. मग तुम्ही पुन्हा नक्की जिंकून सत्तेवर येणार असं पवारांनी फडणवीसांना सांगितलं. आता तुम्ही म्हणाल हे फिटलं काय भानगड आहे. पवारांनी यासाठी खूप दिवसांपूर्वीचा फिटलं या शब्दाचा किस्सा सांगितला. क्रांतीसिंह नाना पाटील हे एकदा बीड लोकसभा निवडणुकीत उभे होते. प्रचाराच्या काळात नाना पाटील यांनी मी जिंकलो तर तुमचं सर्व कर्ज फिटलं असं समजा अस आश्वासन दिलं होतं. आणि त्या एका शब्दावरुन नाना पाटील त्यावेळी मोठ्या मताधिक्याने बीडमधून लोकसभेवर गेले होते. तसं शेतक-यांना तुमचं सगळं कर्ज फिटलं असं आश्वासन द्या म्हणजे तुमचा सत्तेवर येण्याचा मार्ग मोकळा झाला असं समजा असही पवार म्हणाले.

COMMENTS