पेट्रोल, डिझेल स्वस्त होऊनही राज्यातल्या जनतेला फायदा नाही !

पेट्रोल, डिझेल स्वस्त होऊनही राज्यातल्या जनतेला फायदा नाही !

मुंबई – राज्य सरकारने डिझेल आणि पेट्रोलवर 20 दिवसांत दुस-यांदा अधिभार लावल्याने डिझेल आणि पेट्रोल स्वस्त होऊनही त्याचा फायदा राज्यतल्या जनतेला होणार नाही. कालच पेट्रोल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर तब्बल 2 रुपयांपेक्षा जास्त पैशांनी कमी केले आहेत. मात्र त्याचा काहीच फायदा राज्यातल्या जनतेला होणार नाही. कारण पेट्रोल कंपन्यांनी जेवढे दर कमी केले तेवढचा अधिभार राज्य सरकराने लावला आहे. त्यामुळे जुन्याच दराने नागरिकांना पेट्रोल आणि डिझल खरेदी करावे लागणार आहे. 25 एप्रिल रोजीच राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर 3 रुपये अधिभार लावला होता. आता त्यानंतर केवळ 20 दिवसांत दुस-यांदा अधिभार लावण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना नाराजी व्यक्त केली आहे.

COMMENTS