पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्या गाडीला अपघात

पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्या गाडीला अपघात

कोल्हापुरचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या गाडीला आज (दि.29) अपघात  झाला. या अपघातात विश्वास नांगरे पाटील किरकोळ जखमी झाले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी विमानतळाकडे जात असताना हा अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार,  राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूर जिल्ह्याच्या दौ-यावर होते. यावेळी ते मुंबईला जाण्यासाठी कोल्हापूर विमानतळावर आले. त्यावेळी कोल्हापूर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे- पाटील विमानतळाकडे जात असताना उजळाईवाडीजवळ त्यांच्या सरकारी गाडीचा अपघात झाला. गाडी भरधाव वेगाने जात असताना एका वळणावर त्यांच्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने रस्त्याच्याकडेला असणा-या खड्यात जाऊन पडली. या अपघातात विश्वास नांगरे- पाटील किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यासह तिघेजण सुखरूप असल्याचे सांगण्यात येत आहे.

COMMENTS