पोलीस कर्मचा-याला मारहाण करणा-या भाजप नगरसेविकेच्या पतीला अटक

पोलीस कर्मचा-याला मारहाण करणा-या भाजप नगरसेविकेच्या पतीला अटक

पोलीस कर्मचा-याला मारहाण करणा-या भाजपच्या नगसेविका कमल घोलप यांचा पती बापू घोलप यांना अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घोलप हा काल रात्री निगडी पोलीस ठाण्यात माझ्या प्रभागातील नागरिकांच्या तक्रारी घेऊन आला होता. मात्र, मुळ तक्रारदार सोबत नसल्याने पोलिसांनी पहिले तक्रारदाराला आणा मग तक्रार घेतो असे सांगितले. यावेळी घोलप याने गोंधळ सुरू केला. तसेच पोलीस कर्मचा-याला शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली. दरम्यान, पोलिसांनी घोलप याला अटक केली असून सरकरी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

COMMENTS