प्रकाश मेहतांच्या अडचणीत वाढ, लोकायुक्तांमार्फत होणार चौकशी

प्रकाश मेहतांच्या अडचणीत वाढ, लोकायुक्तांमार्फत होणार चौकशी

मुंबई –  गृहनिर्माण मंत्री प्रकाश  मेहतांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी लोकायुक्तांना प्रकाश  मेहतांच्या  चौकशीचे आदेश दिले आहेत. प्रकाश मेहता यांची मुंबईतील एम.पी मिल कम्पाऊंड प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र यांनी प्रकाश मेहतांची चौकशी लोकायुक्तांकडून करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र प्रकाश मेहता आमदार असल्याने लोकायुक्तांकडून चौकशी होण्याअगोदर राज्यपालांची संमती आवश्यक होती. मुख्यमंत्र्यांनी संमती देण्यासाठी राज्यपालांना विनंती केली होती. त्यानुसारच आता प्रकाश मेहता यांची लोकायुक्तांमार्फत चौकशी केली जाणार आहे.

मुंबईतील ताडदेवमधल्या एम. पी. मिल कम्पाऊंड येथील एसआरए प्रकल्पात एफएसआय घोटाळा केल्याचा आरोप गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्यावर आहे. विकासकाला फायदा देण्यासाठी नियम बाजूला ठेवून एफएसआयच्या इतर वापरासाठी मंजुरी दिल्याचा आरोप प्रकाश मेहतांवर होत आहे.या प्रकरणी आता लोकायुक्तांमार्फत प्रकाश  मेहतांची  चौकशी केली जाणार आहे.

COMMENTS