बलात्कारप्रकरणी बाबा राम रहिमला 10 वर्षांची शिक्षा

बलात्कारप्रकरणी बाबा राम रहिमला 10 वर्षांची शिक्षा

रोहतक – साध्वी बलात्कार प्रकरणी न्यायालयाने दोषी ठरविलेल्या राम रहीम याला विशेष सीबीआय न्‍यायालयाने आज दहा वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. रोहतक तुरुंगातच त्‍याच्या शिक्षेवर आज सुनावणी झाली. तब्‍बल 15वर्षांनी या प्रकरणाचा निकाल लागला.

बाबा राम रहीमला हरीयाणातील रोहतकच्या तुरुंगात ठेवण्यात आले आहे. तेथील विशेष न्यायालयातच ही शिक्षा सुनावण्यात आली. दरम्यान, बाबा राम रहीम याने आजवर केलेल्या समाजसेवेचा विचार करण्यात यावा, अशी विनंती त्याच्या वकिलांनी केली आहे. आता बाबा राम रहीमचे वकील त्याच्या जामिनासाठी उच्च न्यायालयात जाऊ शकतात. या प्रकरणाची सुनावणी सुरू असताना बाबा राम रहीमला अश्रू अनावर झाले, तो न्यायालयाकडे हात जोडून दयेसाठी याचना करत होता.

राज्यभर उसळलेल्या हिंसा लक्षात घेऊन रोहतक जिल्हा कारागृहात तात्पूरत्या स्वरुपात कोर्टरूम तयार करण्यात आली आहे. या कोर्टरूममधून न्यायमूर्ती जगदीप सिंह बलात्कारी राम रहीमला शिक्षा सुनावणार आहेत. 25 ऑगस्ट रोजी उसळलेल्या आगडोंबानंतर प्रशासनाने सुरक्षा रक्षक तैनात करण्याचा निर्यण घेतला आहे. रोहतकला पूर्ण लष्करी छावणीचे स्वरूप देण्यात आले आहे. शहरात मोक्याच्या ठिकणी ‘चेक पॉईंट’ उभे करण्यात आले आहे. जिल्हा पोलीससह निमलष्करी जवानही तैनात करण्यात आले आहेत, अशी माहिती पोलीस आयुक्त नवदीप सिंह यांनी दिली आहे.

COMMENTS